By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : navi Mumbai
एपीएमसी फळ मार्केटमध्ये अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गरोदर महिलेला तात्काळ रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक होते. परंतु या महिलेला तब्बल दोन तास बसमध्येच बसवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. पण या मार्केटमध्ये अद्यापही स्वतःची अॅम्बुलन्स देखील नाही. एपीएमसी बाजार आवारात जे रुग्ण सापडतात ते त्याच ठिकाणी 5 तास बसून असतात या रुग्णांना कोणत्याही प्रकारची तत्काळ सेवा दिली जात नाही. यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती ढासळत आहे, असं सांगितलं जात आहे.
एपीएमसीमध्ये तीन दिवसांपासून 1200 लोकांचे टेस्ट करण्यात आले आहे. आताच्या रिपोर्टप्रमाणे पन्नास पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये कमीतकमी 10 ते 12 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोना पॉझिटिव्ह होऊन सुद्धा काहीजण मार्केटमध्ये आणि ऑफिसमध्ये ये जा करत होते, असंही सांगितलं जात आहे.
नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका मुख्यालयास भेट दिली.
एपीएमसी मार्केट बंद करणे शक्य नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केटमध्ये विशेष उपयोजना कराव्या तसेच मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची स्क्रिनिंग केली गेली पाहीजे आणि एपीएमसी मार्केटवर विशेष लक्ष केंद्रित करा आशा सूचना यावेळी सतेज पाटील यांनी दिल्या. पण एपीएमसी मार्केटमधील काही व्यापारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने टोकनच्या नावाखाली पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक होत आहे. यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्राणावर गर्दी वाढली आहे. मार्केटमध्ये ना मास्क, वापरला जातो ना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाते. अशी परिस्थिती असताना कोरोनाला कसं रोखणार अशी चर्चा बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये फक्त मंत्री येतात आणि सूचना देऊन जातात. परंतु, याठिकाणी या सुविधा सामान्य जनतेला देणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये स्वतःचे आरोग्य खाते आहे पण ते कोमामध्ये आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडे MBBS ची पदवी देखील नाही. एपीएमसी मार्केट हे आता कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. नियंत्रणा बाहेर परिस्थिती आहे, असा आरोपही लोकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, नवी मुंबईकरांसमोर पुन्हा रुग्णवाढीचे संकट उभे ठाकले आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजारचा टप्पा गाठेल, तर मृतांचा आकडा 400 पार गेला आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 12 तास कामाला वाहून घेतले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे.
देशात आतापर्यंत २४ राज्यांमध्ये एक देश- एक रेशन कार्ड (One Nation One Ration card) ही योजना ला....
अधिक वाचा