By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 10:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्य सरकारने राज्यातील सर्व मॉल 5 ऑगस्टपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी सरकारकडून नियमावलीदेखील जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या परवानगीनुसार राज्यासह नवी मुंबईतही कालपासून (5 ऑगस्ट) मॉल सुरु झाले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 5 ऑगस्टपासून सुरु झालेले मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिका आयुक्तांच्या आदेशामुळे काल सुरु झालेले मॉल आजपासून पुन्हा बंद झाले आहेत. कोरोनामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
नवी मुंबई शहरात कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सिवूडस भागातील मॉल पुन्हा खुले करण्यात आले होते. ग्राहकांनी मॉलमध्ये यावं यासाठी काही आकर्षक भेटवस्तूदेखील ग्राहकांना दिल्या गेल्या. सिवूडस येथील एका मॉलमध्ये तर पहिल्याच दिवशी तब्बल साडेतीन हजार ग्राहकांनी भेट दिली.
पहिल्याच दिवशी एवढ्या संख्येने ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यामुळे मॉल व्यवस्थापकदेखील भारावून गेले. मॉलमधील 60 टक्के दुकाने सुरु असली तरी कोरोनाकाळात मिळालेला प्रतिसाद पाहता मॉल व्यवस्थापकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, महापालिकेने आज पुन्हा मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईत अद्यापही कोरोना नियंत्रणात आलेला नाही. शहरातील प्रत्येक नोडमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. यापैकी एखादा रुग्ण मॉलमध्ये गेल्यास पुन्हा कोरोनाचा स्फोट होऊ शकतो. सध्या नियंत्रणात असलेली परिस्थितीत हाताबाहेर जाऊ शकते, या भीतीमुळे अभिजीत बांगर यांनी पुन्हा मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशमुळे 5 ऑगस्टपासून सुरु झालेले मॉल बंद करण्यात आले. महापालिकेच्या निर्णयामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना मॉल सुरु झाल्याचा आनंद एक दिवसाचा ठरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. सतत पडणा....
अधिक वाचा