ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

20 आणि 21 नोव्हेंबरला शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 17, 2020 09:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

20 आणि 21 नोव्हेंबरला शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा

शहर : जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचं समजलं जात आहे. शरद पवार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार इथ शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणार आहेत.

भाजपमध्ये अन्याय झाल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शरद पवार 20 आणि 21 तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. कारण केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर धुळे आणि नंदुरबारमध्येही खडसेंचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. शरद पवार यांच्या या दौऱ्यानिमित्त भाजपमधील अनेक खडसे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्यात कोण कोण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याकडे लक्ष लागलं आहे. शरद पवार यांचा हा दौरा हा उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळकटी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या दौऱ्यात काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

खडसेंना विधानपरिषदेचं सदस्यत्व

40 वर्ष भाजपमध्ये काम करुन विविध पदांवर काम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील महिन्यात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करताना कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रवेश केला असल्याचं सांगणाऱ्या खडसे यांचं नाव राष्ट्रवादीने राज्यपाल नामनियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी देत त्यांचा 'सन्मान' केला असल्याचं बोललं जात आहे.

मागे

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 'जैश'च्या दोन दहशतवाद्यांना अटक
दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 'जैश'च्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दहशतवादी हल्ल्याचा (terror attack ) कट उधळून लावल्य....

अधिक वाचा

पुढे  

कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना द्या, उद्धव ठाकरे यांचे आवाहन
कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना द्या, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्क येथील स्मृ....

Read more