By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 02:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भय्ये” माफी मागणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विचारला आहे.
‘सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर विचारला आहे. “मराठी भय्ये” म्हणणाऱ्या आव्हाडांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय.महाराष्ट्रा आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का?#MahaPoliceMyPride
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 4, 2020
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला. या अहवालात त्यांनी सुशांतने आत्महत्याच केली असून, त्याच्या हत्येची शक्यता फेटाळून लावली. याआधीही एम्सच्या विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग झाल्याचा दावा फेटाळून लावला होता. या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, ‘सीबीआयने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, जेणेकरुन सत्य लोकांसमोर येईल’, अशी मागणी केली.
सुशांतच्या कुटुंबासोबतच त्याच्या चाहत्यांनीही हत्येचा संशय व्यक्त करत न्यायासाठी सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले.
चलनी नोटांद्वारे कोणत्याही प्रकारचा व्हायरस आणि जीवाणू एका व्यक्तीपासून ....
अधिक वाचा