ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मेट्रो कारशेडसाठी आरेऐवजी 'ही' पर्यायी जागा; उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 07:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मेट्रो कारशेडसाठी आरेऐवजी 'ही' पर्यायी जागा; उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव

शहर : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून कारशेडसाठी पर्यायी जागा सुचविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आम्ही मेट्रो कारशेडसाठी गोरगावमधील आरपीएफ मैदानाच्या जागेचा प्रस्ताव विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन दिल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

फडणवीस सरकारच्या काळात आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या उभारणीचे काम सुरु झाले होते. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली होती. सरकारच्या या कृतीचा अनेकांकडून निषेध करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर आरे कारशेडचा मुद्दा मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते.

त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. मात्र, या निर्णयामुळे संपूर्ण प्रकल्पच धोक्यात येईल आणि मुंबईचा विकास रखडेल, अशी भीती भाजपकडून व्यक्त करण्यात आली होती. मेट्रो प्रकल्पासाठी जपानच्या जायका कंपनीने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. मात्र, अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत. परिणामी १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, अशी भीती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोरेगावमधील आरपीएफ मैदानात आरे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव कितपत व्यवहार्य आहे आणि ठाकरे सरकार तो स्वीकारणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

मागे

मुंबईत 10 टक्के पाणी कपात
मुंबईत 10 टक्के पाणी कपात

मुंबईकरांना पुढील सात दिवस पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. महापालिकेच....

अधिक वाचा

पुढे  

'महापोर्टल बंद करा, सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या'
'महापोर्टल बंद करा, सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या'

फडणवीस सरकारच्या काळात सरकारी नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले महापोर्टल ....

Read more