By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या बेबी शाम्पूवर देशभरात बंदी आणण्यात आली आहे. तर, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेली ही कारवाई अमान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम या राज्यांमधून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घातक रसायनांचे प्रमाण आढळून आल्यानंतर दुकानं आणि गोदामांमधून शाम्पूचा साठा हटवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. यावर कंपनीच्या प्रवक्त्यांनी निवेदन जारी केले आहे. जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीकडून बंदीबाबत खुलासा करण्यात आलाय. हे अंतरिम निकाल अयोग्य चाचण्यांमधून आले आहेत. बालहक्क आयोगाच्या कारवाईवर कंपनी सहमत नाही असा खुलासा कंपनीने केलाय.
बालहक्क आयोगाने केलेल्या कारवाईची माहिती नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. केंद्रीय औषध प्रयोगशाळेतील अंतिम निकालांची प्रतीक्षा आहे. बेबी शाम्पूमध्ये कोणतंही घातक रसायन वापरले जात नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर, याआधी देखील जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टवर अनेक आरोप झाले आहेत. परदेशात अनेक ठिकाणी यावर कारवाई देखील झालीय. जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रोडक्टमध्ये कँसरयुक्त पदार्थ असल्याचे आरोप होत आले आहेत. कंपनीच्या प्रोडक्टमध्ये एस्बेस्टस असतं ज्यामळे कँसर सारखा आजार होऊ शकतो अशी तक्रार अनेकदा देण्यात आलीय.
अनेक लोकांना वाटतं करोडपती होणं हे आपल्या आवाक्यातील काम नाही. परंतु खरं ....
अधिक वाचा