By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 05:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर पाठींबा दिलाय. आदिवासींच्या जागांना धक्का न लावता धनगरांना आरक्षण दिलं जाऊ शकतं अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. देशातील शंभर ते सव्वाशे शेतकरी संघटना आंदोलन करणार आहेत. त्यांना पाठिंबा द्यायची आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. ओबीसींनी मन मोठं करून मराठा समाजाला आरक्षणात सामावून घ्यावं असं अमोल कोल्हे म्हणाले होते. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने धनगर आरक्षणाला जाहीर पाठींबा देऊन आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज राज्यसभेत ज्या घटना बघायला मिळत नाहीत त्या घडत आहेत. मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली आहे, त्याबाबत राज्य सरकारबरोबर गेले दोन दिवस मी चर्चा करत आहे. काही कायदेतज्ज्ञांबरोबर चर्चा केली. न्यायालयात अपिल लवकर करायचे होते. यामुळे मला दिल्लीत जाता आलं नसल्याचे पवार कृषी विधेयका संदर्भात बोलताना म्हणाले.
पवारांचे उपोषण
निलंबित राज्यसभा खासदारांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार आज उपोषण करणार आहेत. राष्ट्रवादीने शेतकरी विधेयकांना विरोध करण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे.
आज कितीही जाहिराती दिल्या तरी उपाध्यक्षांची सदनाकडे बघण्याची भूमिका अवमूल्यन करणारी आहे. हरिवंश यांच्या संसदेतील वागण्याची बिहारच्या लोकांना चिंता वाटली असेल असेही पवार म्हणाले.
...म्हणून मी राज्यसभेत गेलो नव्हतो- शरद पवार
राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी आपण का हजर नव्हतो, याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत दिले. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. मी अनेक कायदे तज्ज्ञांबरोबरही बोललो. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला मुंबईत थांबावे लागले आणि दिल्लीला जाता आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस प....
अधिक वाचा