ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

NEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 17, 2024 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

NEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक

शहर : लातूर

यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीट ची झालेली फेरपरीक्षा दिली नव्हती.

लातूर NEET पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय. लातूरमधील दोघा शिक्षकांना हाताशी धरून त्यानं NEET गुणवाढीचं आमीष दाखवलं.  लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी-पालकांकडून लाखो रुपये उकळले जायचे. नीट घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन याची फेरपरीक्षा घेण्यात आली. पण यात आणखी एक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कुठे आणि काय घडलाय हा प्रकार? जाणून घेऊया.

'नीट' परीक्षेच्या निकालावरून देशभरात मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी केंद्र सरकारला यावरुन धारेवर धरले. या प्रकरणाचा जाब विचारण्यात आला. दरम्यान यात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीट ची झालेली फेरपरीक्षा दिली नव्हती. असे असतानाही तिला नव्याने गुणपत्रिका आली आहे. त्यात तिचे मार्क्स 640 वरून थेट 172 इतके खाली आले आहेत. परीक्षेतील या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थीनी भूमिका डांगेला जबर मानसिक धक्का बसला आहे. भूमिकाला पहिल्या परीक्षेत 640 गुण मिळाले होते आणि ऑल इंडिया रैंक 11 हजार 769 होती. पण अचानक आलेल्या या मार्कशिटमुळे तिला आता काय करावे हे सुचत नाहीय? दरम्यान या प्रकरणामुळे 'नीट' चा गलथन कारभार समोर आला आहे.

भूमिका हिने दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नव्हती. तरी तिला नव्याने  गुणपत्रिका मिळाली. एकतर परीक्षाच दिली नसताना गुणपत्रिका यायलाच नको होती. त्यातही आधीच्या परीक्षेत मिळालेले गुण कमी करुन दाखवले.आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण 172 नी कमी झाले. कमी झालेल्या गुणांमुळे ती 11 हजाराच्या रॅकवरून थेट 11 लाख 15 हजार 845 व्या रॅकवर घसरली गेली आहे. एनटीएने ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली होती. या परीक्षेशी भूमिकाचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे तिने ही परीक्षा दिली नव्हती.

असे असतानाही पुनः परीक्षेच्या निकालानंतर तिची गुणपत्रिका बदलून मिळाली. ज्यात हा घोळ समोर आला. यानंतर भूमिका आणि तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगल्याने पालक आता चिंतेत आहेत. याबाबत आम्ही एनटीएला ई-मेलही पाठविला पण त्यांच्याकडून काहीच प्रत्युत्तर आले नसल्याने आता काय करावे? असा प्रश्न भूमिकाचे वडील राजेंद्र डांगे यांनी उपस्थित केलाय.

गंगाधरकडून मोबाईल, प्रवेशपत्र जप्त

सीबीआयनं गंगाधरकडून मोबाईल फोन आणि NEET परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं जप्त केलीत. त्या मोबाईलमधून फसवणुकीचे अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आलेत. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले दोन शिक्षक आणि मध्यस्थ इरण्णा कोनगलवार यांच्या मतदीनं गंगाधरनं पेपरफुटीचं रॅकेट कसं चालवलं होतं, याचा पर्दाफाश होणाराय... गंगाधरला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय आता इरण्णाच्या मागावर आहे. तो हाती लागल्यानंतर NEET पेपरफुटी घोटाळ्याचं सगळा काळा कारभार उजेडात येण्याची शक्यता आहे.

मागे

पावसामुळे पूरस्थिती, तोडगा काढा...; याचिकेवर न्यायालय म्हणतं, 'आता काय देवाला आदेश देऊ?'
पावसामुळे पूरस्थिती, तोडगा काढा...; याचिकेवर न्यायालय म्हणतं, 'आता काय देवाला आदेश देऊ?'

महाराष्ट्रात सध्या पावसानं दमदार हजेरी लावली असून बहुतांश भागांमध्ये पूर....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं,24 जुलैपासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू
मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं,24 जुलैपासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! विनोद तावडे यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून ही म....

Read more