By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
येत्या डिसेंबरपासून एनईएफटी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुविधा 24 तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण समितीच्या काल झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे ग्राहक बँक खात्यातील रकमेचा देवाण-घेवाणीचा व्यवहार एनईएफटीच्या माध्यमातून येत्या डिसेंबरपासून 24 तास करू शकणार आहेत. याची सुविधा सकाळी 8 ते सायंकाळी 7 या कालावधीतच उपलब्ध असते. त्याशिवाय दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार-रविवारी ही सुविधा मिळत नाही, म्हणजे बँका सुरू असतानाच या सुविधेचा लाभ घेता येतो. मात्र रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे ही सुविधा येत्या डिसेंबरपासून 24 तास उपलब्ध असेल.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे येथे अतिवृष्टीने महाप....
अधिक वाचा