ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त, नव्या कोरोनाची धास्ती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2020 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त, नव्या कोरोनाची धास्ती

शहर : मुंबई

स्कॉटलंडहून आलेल्या नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त आढळला आहे. या घटनेमुळे नाशिकात एकच खळबळ उडाली आहे. परदेशात सध्या नव्या कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला आहे. अशातच परदेशातून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा विषाणू नव्या कोरोनाचा तर नाही ना अशी शंका वर्तवली जात आहे. यामुळे या घटनेचं गांभीर्य सर्वाधिक आहे.

१३ डिसेंबरला हा तरूण स्कॉटलंडहून भारतात आला होता. २६ डिसेंबरला या तरूणाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी स्वॅब रवाना करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे परदेशातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घालण्यात आली आहे. ही विमान सेवा आता बंद आहे.

स्कॉटलंडहुन आलेला युवक १३ डिसेंबर रोजी भारतात आला होता. दिवस होम क्वारंटाईन झाल्यानंतर या तरूणाची आई २४ डिसेंबर कोरोना पोझिटीव्ह  आली आहे. २६ डिसेंबर रोजी मुलगाही  कोरोना पोझिटीव्ह आला. कुटुंबात परदेश दौऱ्याची माहिती असल्यामुळे या दोघांना नवीन व्हायरस असल्याची भीती वर्तवली जात आहे.

युवकाच्या  स्वॅबचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दोन दिवसांत या रिपोर्टचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तसेच या तरूणाच्या संपर्कात आलेल्यांची देखील कोरोना तपासणी होणार आहे.

Recommended Articles

मागे

शिवभोजन थाळीला जोरदार टक्कर, १ रुपयात थाळीसाठी उडाली झुंबड
शिवभोजन थाळीला जोरदार टक्कर, १ रुपयात थाळीसाठी उडाली झुंबड

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद �....

अधिक वाचा

पुढे  

आता रेल्वेप्रवास आणखी सोपा, IRCTC च्या ‘या’ सुविधेमुळे समजणार रेल्वेची अचूक वेळ
आता रेल्वेप्रवास आणखी सोपा, IRCTC च्या ‘या’ सुविधेमुळे समजणार रेल्वेची अचूक वेळ

रेल्वेचा प्रवास हा सर्वांत सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रेल्वेनेच प्रवास ....

Read more