ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इटलीमध्ये कोरोनाचं थैमान कायम,मृतांचा आकडा पाहून धक्काच बसेल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 07:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

इटलीमध्ये कोरोनाचं थैमान कायम,मृतांचा आकडा पाहून धक्काच बसेल

शहर : विदेश

इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेला प्रसार आज अनेक देशांमध्ये जावून पोहोचला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे इटलीमध्ये पाहायला मिळतं आहे. चीन पेक्षा ही अधिक फटका इटलीला बसत आहे. जगभरातील देश मृतांचा वाढता आकडा पाहता चिंतेत आले आहेत. हा व्हायरस भारतात ही येवून ठेपला आहे. भारतात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

कोरोना व्हायरस जगासाठी आज चिंतेचा विषय बनला आहे. चीनपासून हा व्हायरस संपूर्ण जगात पसरत आहे. पण कोरोनाचा सर्वाधिक कहर हा इटलीमध्ये पाहायला मिळतो आहे. इटलीमध्ये कोरोनाने शुक्रवारी तब्बल 627 लोकांचा जीव घेतला आहे. तर कोरोना झालेले नवीन 5986 रुग्ण समोर आले आहेत.

इटलीमध्ये आतापर्यंत एकूण 4032 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 47,021 वर पोहोचली आहे.

इटलीमध्ये कोरोना व्हायरस खूप जलद गतीने पसरत आहे. इटलीमध्ये 2,655 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी येथील मृतांचा आकडा हा चीन पेक्षा हा अधिक होता.

इटली आणि चीनमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. कोरोना हा वृद्ध व्यक्तींना लवकर होत असल्याचं आतापर्यंतच्या निरीक्षणातून पुढे आलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे प्रतिकार क्षमता कमी होते. ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत. अशा लोकांना त्याची लवकर लागण होताना दिसत आहे. डायबिटीज, फुफ्फुसा संदर्भातील आजार असलेल्या लोकांना कोरोनाची लागण लवकर होत आहे.

मागे

भारतात ही हळूहळू वाढत चालला आहे कोरोना, एका आठवड्यात रुग्णांची संख्या ८९ वरुन २५० वर
भारतात ही हळूहळू वाढत चालला आहे कोरोना, एका आठवड्यात रुग्णांची संख्या ८९ वरुन २५० वर

चीन आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. इतर देशांमध्ये देखील....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन
मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह जवळपास 10 शहरांचे व्यवहार आजपासून (21 मार्च) पुढ....

Read more