By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 03:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
रेल्वे तिकिटांच्या ऑनलाइन बुकिंगला अधिक सोपं करण्यासाठी भारतीय रेल्वे खात्याने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक सुविधांचा उपयोग घेता येणार आहे. रेल्वेची अधिकृत वेबसाईट इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशनने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत वेबसाईटला अधिक यूजर फ्रेंडली केलं आहे.
सोपं डिझाईन आणि नवे फीचर्समुळे आता वेबसाईटवर (www.irctc.co.in) सहजपणे ‘ट्रेन तिकिट’ उपलब्धतेचा पर्याय देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी यूजर्सला वेबसाईटवर लॉगइन करण्याची आवश्यकता नाही.
रिक्त जागांची माहिती एका क्लिकवर
नव्याने उपलब्ध करुन आलेल्या सुविधांमध्ये रेल्वे प्रवाशांना कोणत्याही रेल्वेतील रिक्त जागांची माहिती घेणेही सोपं झालं आहे. केवळ एका क्लिकवर प्रवाशी कोणत्याही रेल्वेतील रिक्त जागांची माहिती मिळवू शकतात. यासाठी प्रवाशांना कोणत्याही लॉगइन करण्याची गरज नाही. यात रेल्वेच्या कोणत्या बर्थमध्ये (डबा) कोणती जागा रिक्त आहे हे समजू शकणार आहे. यासाठी प्रवाशांना संबंधित रेल्वेचं नाव/नंबरची माहिती दिल्यानंतर ‘गेट ट्रेन चार्ट’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या एका क्लिकवर रिक्त जागांची सर्व माहिती प्रवाशांसमोर असणार आहे.
रिक्त तिकिटांसाठी पर्याय योजना
या सर्व फीचर्ससोबतच आयआरसीटीसीने वेटिंग लिस्टमध्ये (प्रतिक्षा यादी) प्रवाशांसाठी पर्याय योजना देखील सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना अन्य रेल्वेत आरक्षित तिकिट मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे.
कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असलेल्या व्यक्तीसाठी त्याचा निर्वाह निधी म....
अधिक वाचा