By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लग्नसराईच्या निमित्ताने तुम्हाला सोन्याची खरेदी करायची असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. 1 जानेवारीपासून सोन्याची खरेदी करण्याचे नियम बदलणार आहेत. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सोनं- चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सक्तीचं करण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे.सरकारच्या या निर्णयाचा दागिने उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. देशाच्या दुर्गम भागात हे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी एक वर्षांची मुदत दिली जाईल. ग्राहकांना याचा चांगला फायदा मिळू शकेल.
सध्या 40 टक्के दागिन्यांचं हॉलमार्किंग केलं जातं. हॉलमार्किंग केलेले दागिने हे पूर्णपणे शुद्ध सोन्याचे असतात. भारत हा सोन्याची आयात करणारा मोठा देश आहे. भारतात दरवर्षी 700 ते 800 टन सोनं आयात केलं जातं.
काय असतं हॉलमार्किंग?
हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत सोन्याच्या दागिन्यात शुद्ध सोनं किती आणि इतर धातूंचं प्रमाण किती हे तपासलं जातं. सोन्याच्या शुद्धतेबद्दल अधिकृत प्रमाणपत्र देणं म्हणूनच आता सक्तीचं करण्यात आलं आहे. यासाठी ज्वेलर्सना परवानेही घ्यावे लागतील.
जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याल....
अधिक वाचा