By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2020 12:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांच्यामाध्यमातून ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडला. हा नवा स्ट्रेन अंत्यत घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले. त्यामुळे कोरोनाचा (Coronavirus) पुढील कोणताही धोका नको म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. आता इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव सुरु झाली आहे. नाशिकमध्ये इंग्लंडहून आलेल्या ६८ नागरिकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली आणि अहमदनगरमध्येही नागरिकांचा शोध सुरु आहे. आसपासचे कुणी इंग्लंडमधून आले असल्यास प्रशासनाला कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे. नव्या कोरोनामुळे २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून राज्यात परतलेल्या नागरिकांचा शोध सुरू करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात इंग्लंडहून ६८ नागरिक आले आहेत. यात शहरातल्या ४८ जणांचा तर जिल्ह्यातल्या २० जणांचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवलीत ५५ जण इंग्लंडमधून परतल्याचं समोर आले आहे. या सर्वांचा आता शोध सुरू असून त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. अहमदनगरमध्ये ११ जण परतल्याची माहिती समोर आलीय. नगरमधल्या या सर्वांचा शोध लागला असून यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. तसंच त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात येणार आहे. रत्नागिरीतही ९ जण ब्रिटनहून परतले आहेत. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईड लाईन्स जारी केल्या आहेत. हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणाऱ्या असिम्प्टमॅटिक (लक्षणे नसलेले) प्रवाशांना विमानतळावर उतरल्या उतरल्या आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही. मात्र पुढील पाच ते सात दिवसांमध्ये ही चाचणी करावी लागणार. ही चाचणी निगेटीव्ह आल्यास सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ही चाचणी पॉझिटीव्ह असल्यास आणि रूग्ण असिम्प्टमॅटिक असल्यास त्याच हॉटेलमध्ये पुढील १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी आता थेट भाजपचे ने....
अधिक वाचा