ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शहर : मुंबई

रस्ते अपघातातील जखमींवर गोल्डन अवरमध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचण्यास मोठी मदत होणार आहेअसे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तळेगाव टोलनाक्याच्या बाजूला ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आरोग्यमंत्रांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणेआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यासमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणालेएमएसआरडीसीआरोग्य विभागएसजी डायग्नोस्टिक आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता अपघातग्रस्तांना तातडीने प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे आता या ट्रॉमा केअर युनिटमुळे अपघातग्रस्त नागरिकांना पहिल्या तासात (गोल्डन अवर) योग्य उपचार मिळतील जेणेकरून त्यांचे प्राण वाचवले जाऊ शकतील. या ट्रॉमा केअरमध्ये जखमींवर प्राथमिक उपचार करून आवश्यकता भासल्यास तिथून जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यात येईलअसे सांगून आरोग्यमंत्री म्हणालेहे ट्रॉमा केअर 24 तास सुरू राहणार असून तेथे डॉक्टरआरोग्य कर्मचारीऔषधेप्राथमिक उपचारासाठी छोटे शस्त्रक्रिया गृहकार्डिअक ॲम्ब्युलन्सशीघ्र प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही)  आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

या द्रूतगती महामार्गावर अशा प्रकारची उपचाराची यंत्रणा प्रथमच झाली असून एमएसआरडीसीपोलीस व आरोग्य विभागसेव लाईफ फाऊंडेशन आणि पवना मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून अपघातग्रस्तांचे प्राण वाचतील. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी हॉटलाईन क्रमांक देण्यात येणार असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी सेव लाईफ फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार करून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेतअसेही श्री. शिंदे यांनी सांगितले.ट्रॉमा केअर प्रकल्प संचालक डॉ. सुयोग गुरव यांनी यावेळी प्रकल्पाबाबत माहिती दिली.

 

मागे

पुन्हा नव्या दमानं जाऊ...
पुन्हा नव्या दमानं जाऊ...

एकीकडे चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरचा तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्यासाठी प्....

अधिक वाचा

पुढे  

गुणवत्तापूर्ण रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गुणवत्तापूर्ण रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक स्तरावरील उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजच्या शिक्षण व्यवस्थे....

Read more