By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2024 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दगडूशेठ, अंबाबाई, सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी; नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात जात देवदर्शन केलं. अनेकांनी नवीन वर्षाची सुरुवात ही देवाच्या दर्शनाने केली आहे.
2024 या नववर्षाची आजपासून सुरुवात होतेय. या नववर्षाची सुरुवात प्रत्येक जण आपआपल्या परीने आणि आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे करतो. अनेक भाविकांनी मंदिरात जात देवदर्शन करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये जात देवाचं दर्शन घेत नववर्षाची सुरूवात केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्रीपासून भाविकांच्या रांगा पाहायला मिळतायेत. वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करत नवीन संकल्प करण्यासाठी अनेक ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने सिद्धिविनायक मंदिरात पोहोचत आहेत. भाविक प्रभादेवी आणि दादर स्टेशनवरून मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सहज दर्शन घेता यावं यासाठी तशी सोय करून देण्यात आलीय.
पुणेकरांची नववर्षाची सुरुवात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी दर्शनासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची मोठी गर्दी केली. नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात आले आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिर परिसर भक्तांनी गजबजला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
आज नवीन वर्षा निमित्त सगळीकडे जल्लोष सुरू आहे. जशी पर्यटन स्थळी गर्दी झाली तशीच देवाच्या दारात सुद्धा भाविक नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आले आहेत. याच निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फळा फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे जरबेरा , गुलाब , शेवंती,गुलछडी, लव्हेंडर ,लाल ,पिवळ्या ,गुलाबी अशा विविध आकर्षक फुलानि तसेच डाळिंब ,अननस , केळी , संत्री ,मोसंबी अशा फळानि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी ,चार खांबी तसेच सभामंडप आणि मंदिरातील विविध भागाना आकर्षक अशा पध्दतीने सजवण्यात आलं आहे. त्यामुळे सावळ्या विठुरायाचं रुप अधिकच खुलून दिसत आहे.
अंबाबाई मंदिरात कोल्हापुरकरांची गर्दी
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात आले आहेत. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर भक्तांनी फुललं आहे. पर्यटकांसोबतच स्थानिक भाविकांची सकाळी सकाळी मंदिरात गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिराची दर्शन रांग हाउसफुल आहे.
नांदेडच्या गुरुद्वारामध्ये भाविकांची गर्दी
नांदेडमधील जगप्रसिध्द गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नांदेडमधील गुरुद्वारा हे शीख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. जगभरातील शीख धर्मियांचे पवित्र धर्मस्थळ असणाऱ्या हुजूर साहिब नांदेड येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा इथं नववर्षानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेकांनी नवीन वर्षाची सुरुवात गुरुद्वारामध्ये जात माथा टेकवत केली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन मुंबईतलं राजकारण तापलं आहे. असं असताना मुं....
अधिक वाचा