ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नववर्षाच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नववर्षाच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर 

शहर : मुंबई

            मुंबई - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. याचाच गैरफायदा घेत महाराष्ट्रात शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्य आणले जाते, बनावट दारू, भेसळ दारूची विक्री केली जाते.


            यामुळे सरकारचा महसूल बुडतोच पण त्याचबरोबर भेसळयुक्त दारू नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची भीती असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबरच्या शेवटच्या विशेष मोहीम हाती घेतली असून शहर आणि उपनगरांत विना परवाना पार्ट्या, बेकायदा दारू, बनावट दारू विक्री रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत.

 

         नववर्षासाठी नाताळपासूनच मुंबईतील गल्लीबोळापासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. या पार्ट्यामध्ये दारू पिण्याकडे लोकांचा अधिक ओढा असतो. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या गोवा, दमण, दादरा, नगर हवेली, सिल्वासा याठिकाणी तुलनेने मद्य स्वस्त दरात मिळते. ही दारू बेकायदा मार्गाने आणण्याचा प्रयत्न केला जातो.        

 
             तसेच स्वस्तातील दारू घेऊन तिच्यामध्ये पाणी तसेच इतर द्रव्यांची भेसळ करून ब्रँडेड दारू स्वस्तात सांगून ती विकली जाते. नजीकच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू बनविणारे तसेच विक्री करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड केली. ३१ डिसेंबरसाठी अशाप्रकारे बेकायदा आणि बनावट दारू विकली जाऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाले आहे.


           मुंबईतील दक्षिण मुंबईपासून वांद्रे परिसरापर्यंतची जबाबदारी अधीक्षक सी. बी. रजपूत यांच्याकडे आहे. शहरात प्रभावी नियंत्रणासाठी नऊ कार्यकारी निरीक्षक तर दोन भरारी अशी मिळून एकूण ११ पथके सज्ज आहेत. उपनगरांतील जबाबदारी असलेल्या स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ कार्यकारी निरीक्षक आणि २ भरारी अशी १६ पथके तैनात असतील. 


         दिवस-रात्र गस्त, क्लब, पब तसेच अन्य ठिकाणी असलेल्या पार्ट्यांची तपासणी, संशयित वाहनांची तपासणी, बेकायदा दारू विक्रेत्यांचा शोध, दुकाने- बार तसेच इतर आस्थापना दिलेल्या वेळेत बंद करणे या सर्वांवर या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांची नजर असेल.

हे लक्षात ठेवा...

पार्ट्यांमधील मद्य सेवनासाठी परवाना आवश्यक, विनापरवाना वा भेसळयुक्त, ड्युटी फ्री, डिफेन्स मद्याचा सार्वजनिक ठिकाणी पार्टीमध्ये वापर करू नये. महागडी दारू स्वस्तामध्ये मिळत असल्यास शहानिशा करावी, त्यातून अपाय होऊ शकतो. हातभट्टीची दारू, परराज्यातील मद्य, किंवा बनावट दारू विकताना आढळल्यास पोलिसांना कळवा.

 

मागे

कोरेगाव-भीमावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
कोरेगाव-भीमावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

      पुणे - कोरेगाव भीमा इथे १ जानेवारीला विजयस्तंभावर २०२ व्या शौर्यदिव....

अधिक वाचा

पुढे  

ट्रक दरीत कोसळून क्लिनर जागीच ठार 
ट्रक दरीत कोसळून क्लिनर जागीच ठार 

     कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहक ट्रक (एमएच-09/सीयू-46....

Read more