ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र आणि न्यूजर्सी दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींवर भर - मुख्यमंत्री

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र आणि न्यूजर्सी दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींवर भर - मुख्यमंत्री

शहर : मुंबई

महाराष्ट्र आणि न्यू-जर्सी यांच्या दरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धींगत करण्याच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी सकारात्मक प्रय़त्न केले जातीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अमेरिकेतील न्यूजर्सीचे गव्हर्नर फिलिप मर्फी यांनी शिष्टमंडळासमवेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.  'न्यू-जर्सी बिझनेस मिशन टू इंडिया'च्या निमित्ताने आयोजित या भेटीत शिष्टमंडळात न्यू-जर्सीतील व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा समावेश होता. यावेळी भारतात विशेषत: महाराष्ट्रात फिन-टेकऔषधीजैव-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रातील संधी आणि गुंतवणुकीबाबत चर्चा झाली.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीउद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगनमहाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोजराजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदान आदी उपस्थित होते. तर न्यू-जर्सीच्या शिष्टमंडळात अमेरिकन वाणिज्य दुतावासातील इलिझाबेथ स्कोलोव्हजोश लुझानोकॅथलीन फनजीरोअन्डी शेणॅायवेस्ली मॅथ्यूऑर्थर कपूरगुंजन दोशीराजीव परीख आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबई हे शहर भारताचे 'ग्रोथ इंजिनआहे. हे शहर आर्थिक राजधानीबरोबरचबँकिंग क्षेत्राचीही राजधानी आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आली आहे. तसेच रोजगार संधीतही महाराष्ट्र अग्रगण्य राज्य आहे. न्यू-जर्सी मध्ये सर्वाधिक महाराष्ट्रीयन आहेत. त्यातही पुणेकरांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. त्यामुळे न्यू-जर्सीत एक विस्तारीत भारत वसला आहे. त्यादृष्टीने या दोन्ही राज्यातील हे संबंध आणखी दृढ करता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील राज्यांनी स्वयंपूर्ण व्हावे आणि त्यांनी त्यांच्या विकासाची वाटचाल सक्षमपणे करावी अशी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि न्यू-जर्सीमधील विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धींगत करूनएक नवीन प्रवास सुरू करता येईलअशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री म्हणालेमहाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे. पण अलिकडे हवामान बदलामुळे राज्यात एकीकडे दुष्काळी आणि एकीकडे पूर अशी परिस्थिती ओढवते. त्यावर शाश्वत उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी जागतिक बँकेने सहकार्य देऊ केले आहे. भारताच्या "फाईव्ह ट्रीलीयन ईकॅानॅामी"च्या वाटचालीत महाराष्ट्राचे मोठे योगदान राहीलअसे प्रयत्न आहेत. त्यामुळेच शक्य त्या वेगाने "ट्रीलीयन इकॅानॅामी"चे उद्दीष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचबरोबर कार्बन उत्सर्जनमुक्त स्वच्छ ऊर्जेचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वापर करण्यावर भर देत आहोत. राज्यातील कृषी क्षेत्रातील उर्जेची  मागणी सौरऊर्जा पर्यायांतून पूर्ण व्हावी असे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र हे 'फिनटेक पॅालीसी" तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे. मुंबईजवळच "इंटिग्रेटेड फिनटेक टाऊनशिप" साकारतो आहोत.  अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध व्हाव्याततसेच गुंतवणूक यावी असे प्रयत्न आहेत. कृषी क्षेत्रावरील अवलंबित्त्व कमी करतानाच उत्पादनक्षम आणि सेवा क्षेत्रात संधी निर्माण व्हाव्यात याकडे लक्ष दिले जात आहे.

यावेळी गव्हर्नर श्री. फिलीप यांनी भारत आणि अमेरिकेचे सौहार्दपूर्ण संबंध आणखी दृढ आणि वृध्दींगत होत असल्याचे सांगितले. दुरसंचारतंत्रज्ञानमनोरंजन क्षेत्रातील डिजीटल तंत्रज्ञानफिनटेकआरोग्य सुविधा यांसहशैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य होतकरूंसाठी अनेक संधी घेऊन येईलअसा विश्वास व्यक्त केला.

मागे

पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी प्रतिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही
पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी प्रतिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही

पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पोलाद तसे....

अधिक वाचा

पुढे  

सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर

 सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर असून  राज्याच....

Read more