By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पुण्याच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने महिलांसाठी ‘ती’ स्वच्छतागृह सुरू केले आहे. एका जुन्या बसमध्ये तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहात वायफाय, टिव्हीसह एक डिजीटल फीडबॅक मशीन आहे.
मुंबईतील हे पहिले ‘ती’ टॉयलेट मरीन ड्राईव्ह रेल्वे स्थानकाजवळ सुरू करण्यात आले आहे. या स्वच्छतागृहात पॅनिक बटण, सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सर, सोलार लाइट्स, ब्रेस्टफिडीग स्टेशन अशा सुविधा महिलांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सारा प्लास्ट इंडिया लिमिटेड या पुण्याच्या कंपनीने हे टॉयलेट बनविले आहे. हे टॉयलेट सशुल्क असणार आहे. या टॉयलेटमध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असलेली उत्पादने, पॅकेज प्रोडक्ट विकणे, टॉयलेटबाहेर बसवर जाहिरात करणे आदीतून मिळणाऱया महसूलापैकी 90 टक्के कंपनी आणि 10 टक्के पालिका घेणार आहे. मरीन ड्राईव्ह नंतर मुंबईच्या इतर भागातही हे स्वच्छतागृह सुरु करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा ....
अधिक वाचा