ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुढचे १५ दिवस भारतीयांसाठी महत्त्वाचे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 18, 2020 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुढचे १५ दिवस भारतीयांसाठी महत्त्वाचे

शहर : देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी १५ दिवस खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा पंधरवडा १३५ कोटी नागरिकांची परीक्षा पाहू शकतो. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या फेज २ मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR या संस्थेने केला आहे.

कुठलीही जागतिक साथ चार टप्प्यांत पसरते. पहिल्या टप्प्यात व्हायरसची लागण परदेशातून आलेल्या व्यक्तींकडून होते. जसं इटलीतून भारतात आलेल्या एका व्यक्तीपासून प्रथम भारतातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.

दुसऱ्या टप्प्यात या व्हायरसची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होते. यात अशा नागरीकांचा समावेश असतो जे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेले असतात.

तिसऱ्या टप्प्यात ही लागण एका समुहापासून दुसऱ्या, समुहापर्यंत पसरते आणि त्या समुहाच्या संपर्कात आलेल्या हजारो नागरिकांना संक्रमित करते.

चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे देशातील एका भागातून हा व्हायरस वेगाने दुसऱ्या भागात पसरु लागतो आणि मग त्याला आवर घालणं अशक्य होतं. सध्या इटली आणि स्पेन हे देश चौथ्या टप्प्यात पोहोचलेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत भारतात कोरोनाचा प्रसार कसा होतोय यासाठी, भारतासाठी खूपच महत्त्वाचे आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

 चीन, इराण, इटली आणि रोमसह युरोपातील देश कोरोना व्हायरसच्या पहिल्या टप्प्यातून काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यात पोहोचले. त्याठिकाणचे नागरिक कोरोनाबाबत जागृत होईपर्यत आणि तिथल्या सरकारी यंत्रणेकडे कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध होईपर्यंत खूप उशीर झाला होता.. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्यानं झाला आणि सगळं काही ठप्प झालं.

मागे

कोरोना विषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर कराल तर होईल कारवाई
कोरोना विषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर कराल तर होईल कारवाई

सध्या जगात सगळीकडे पसरणारा कोरोना (COVID -19) हा विषाणू देशात व राज्यात गतीने पसरत....

अधिक वाचा

पुढे  

'वर्क फ्रॉर्म होम' नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई
'वर्क फ्रॉर्म होम' नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्या कंपन्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्....

Read more