ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे पाच टक्के मागतील: निलेश राणे

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बाळासाहेबांच्या स्मारकातही उद्धव ठाकरे पाच टक्के मागतील: निलेश राणे

शहर : मुंबई

औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्त समोर येत असतानाच यावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे टीका केली आहे. ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण 5 टक्के मागणार, अशी बोचरी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.
औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून यासाठी 65 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या वतीने या स्मारकासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानाच्या 17 एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवन विकसित केले जाणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र, ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर निविदेसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. अद्यापही या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त काही मराठी वृत्तवाहिन्यांनी शुक्रवारी दिले. नीलेश राणे यांनी ही बातमी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला. ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण 5 टक्के मागेल, असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.

मागे

शिरूरमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू
शिरूरमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

शिरुरमध्ये शात्ताबाद येथे घरासमोरील ओसरीत बसल्या होत्या. त्यावेळी पिसाळल....

अधिक वाचा

पुढे  

कश्मीरमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा
कश्मीरमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा

कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद....

Read more