ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 23, 2020 09:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा

शहर : मुंबई

नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये जायची आणखी एक संधी आहे. राज्यातल्या नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षा घेऊन, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ७ ऑगस्टपर्यंत या परीक्षा घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पुनर्परीक्षेची संधी दिली जाते, त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये नववीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जून २०१८मध्ये पुनर्परीक्षेची संधी देण्यात आली होती. या पुनर्परीक्षे करता मूल्यमापन पद्धती इयत्ता नववी करता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणे ठेवण्यात आली होती.

चालू वर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमवीर अशाप्रकारची फेरपरीक्षा घेणे शक्य होणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात एक संधी देण्याची बाब शासनाच्या विचारात होती.

 

मागे

कोरोना:विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश
कोरोना:विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रात....

अधिक वाचा

पुढे  

लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई
लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांच....

Read more