By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर २२ जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याच अखेर स्पष्ट झालं आहे. फाशीच्या शिक्षेवर विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटीव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. फाशीपासून बचाव व्हावा यासाठी अखेरचा मार्ग अवलंबत सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका दाखल केली होती.
परंतु पुनर्विचार याचिका फेटाळल्याने विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांच्यासह चारही आरोपींना अखेर फाशीच देण्यात येईल. पटियाला न्यायालयाने ७ जानेवारीला चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठानं एकमतानं दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.
आता दोषींकडे याचिका फेटाळल्यानंतर एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा. राष्ट्रपती राज्यघटनेतील अनुच्छेद – ७२ आणि राज्यपाल अनुच्छेद -१६१ नुसार दया याचिकेवर सुनावणी घेवू शकतात. तर राष्ट्रपती गृहमंत्रालयाकडून अहवाल मागवतात. मंत्रालयाकडून राष्ट्रपतींना शिफारस पाठवली जाते. व त्यानंतर राष्ट्रपती दया याचिका निकाली काढतात. जर राष्ट्रपतींनी याचिका फेळाळली तर गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा होतो. आणि जर याचिका निकाली काढण्यास विनाकारण उशीर झाला तर त्याआधारे गुन्हेगार पुन्हा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करू शकतात.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: This is a big day for me. I had been struggling for the last 7 years. But the biggest day will be 22nd January when they (convicts) will be hanged. https://t.co/GBfPt9ezIb pic.twitter.com/uMPcVfP7Sf
— ANI (@ANI) January 14, 2020
दरम्यान, हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे. गेल्या सात वर्षापासून मी न्यायासाठी संघर्ष करत आहे. येत्या २२ जानेवारीला आरोपींना फासावर लटकावले जाईल आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस असणार आहे. अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पुणे : पुढच्या महिन्याच्या ९ फेब्रुवारीला पुणे ते बेळगाव दर....
अधिक वाचा