ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भया दोषींना फाशी : अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन मागे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 06:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भया दोषींना फाशी : अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन मागे

शहर : पुणे

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले मौनव्रत आंदोलन मागे घेतले आहे. राळेगण सिद्धी येथील यादवबाब मंदिरात यादवबाबांचे दर्शन घेऊन अण्णांनी आपले मौन व्रत सोडले. २० डिसेंबरला अण्णांनी मौन व्रत धरले होते.

तब्बल ९२ दिवसानंतर अण्णांनी आपले मौन व्रत सोडले आहे. आरोपींना फाशी दिल्याने न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल, अशी प्रतिक्रिया अण्णांनी यावळी दिली. मात्र शिक्षेची अंमलबजावणी व्हायला सात वर्षे लागल्याने हा विलंब का, झाला याचा अभ्यास करून केंद्र आणि राज्यांनी कठोर कायदे करावे, अशी मागणी देखील अण्णा हजारे यांनी केली आहे.

दरम्यान, निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यास उशीर झाला. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला मात्र अखेर न्याय मिळल्याची प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिलीय. तसेच अखेर सात वर्षांनी निर्भयाला न्याय मिळाल्याने दिल्ली निर्भयाच्या वडिलांनी समाधान व्यक्त केलंय. तर निर्भया प्रकरणात सरकारी प्रक्रियेला उशीर लागला मात्र न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया निर्भयाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर तिहार जेलबाहेर नागरिकांनी जल्लोष केला. फाशी झाल्यामुळे यापुढे असं दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते.

मागे

जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू विक्रीसह बार, वाइन शॉप 31 मार्च पर्यंत बंद
जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू विक्रीसह बार, वाइन शॉप 31 मार्च पर्यंत बंद

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लोकांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने जिल....

अधिक वाचा

पुढे  

रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश
रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ५२ वर कोरोना बाधितांची संख्या झा....

Read more