By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 05:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली- निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. या चारही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली असून २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांना फाशी देण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. या चौघेही तिहार तुरुंगात होते. आज त्यांच्या डेथ वॉरंटवर कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीवेळी आरोपींचे वकील आणि निर्भयाच्या आईमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. दोषी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप निर्भयाच्या वकिलांनी केला. तर आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करायची आहे, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. माझ्या अशिलांना मी भेटू शकलो नाही. त्यांचा तुरुंगात मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप करत दोषिंच्या वकिलांनी कोर्टात नवीन याचिका दाखल केली.
तर निर्भयाच्या कुटुंबीयांनी चारही दोषींच्या विरोधात लवकरात लवकर डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली. डेथ वॉरंट जारी केल्यानंतरही दोषींना त्यांचं म्हणणं मांडता येणार आहे. दोषींची एकही याचिका पेंडिग राहिलेली नाही. त्यामुळे कोर्ट या आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी करू शकतं, असं निर्भयाच्या आईने कोर्टाला सांगितलं. सरकारी वकिलांनीही आरोपींच्यावतीने सादर करण्यात आलेल्या याचिकेला विरोध केला आणि ही याचिका केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ही सुनावणी सुरू असताना निर्भयाची आणि आरोपी मुकेशची आई कोर्टात रडल्या.
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत या....
अधिक वाचा