ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या

शहर : मुंबई

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका गुरुवारी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. तसेच पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली. त्यामुळे निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ मानली जात आहे.

उद्या सकाळी साडेपाच वाजता मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना फाशी देण्यात येईल. त्यासाठी तिहार तुरुंगात सर्व तयारी झाली आहे. फाशी देणारा जल्लाद पवनही दोन दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगात दाखल झाला होता. यानंतर फाशी देण्याची तालीमही झाली होती. त्यानुसार आता उद्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल.

गेल्या काही दिवसांमध्ये फाशींनी शिक्षा टाळण्यासाठी जंगजंग पछाडून पाहिले होते. दोषी मुकेश सिंह याने निर्भयावर अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीतच नव्हतो असा कांगावा करत उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली होती. त्यामुळे आपल्या फाशीला स्थगिती द्यावी, असे मुकेशचे म्हणणे होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी ही याचिका फेटाळून लावली होती.

तत्पूर्वी दोषींच्या वकिलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली होती. दोषींच्या वकिलांकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र लिहण्यात आले आहे. यामध्ये २० मार्चला दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

 

मागे

होम क्वारंटाईन केलेल्या चौघांचा रेल्वेने प्रवास; बोरिवली स्थानकातून घेतले ताब्यात
होम क्वारंटाईन केलेल्या चौघांचा रेल्वेने प्रवास; बोरिवली स्थानकातून घेतले ताब्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना वारंवार दे....

अधिक वाचा

पुढे  

स्वत:ची आई ICU मध्ये, मात्र लेकाची महाराष्ट्राला वाचवण्यासाठी धडपड, राजेश टोपेंना सलाम
स्वत:ची आई ICU मध्ये, मात्र लेकाची महाराष्ट्राला वाचवण्यासाठी धडपड, राजेश टोपेंना सलाम

महाराष्ट्रात ‘कोरोना व्हायरस’ हातपाय पसरु लागल्यामुळे आरोग्यमंत्री य....

Read more