By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : patiala
नवी दिल्ली- पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याच्या याचिकेवरील सुनावणी करताना फाशीच्या निर्णयाला ‘स्टे’ लगावला आहे. या प्रकरणातील आरोपींना येत्या २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. परंतु दया अर्ज प्रलंबित असल्याने आता ‘डेथ वॉरंट’वर स्वत:च स्थगिती येते. त्यासाठी शुक्रवारी म्हणजे उद्या १७ जानेवारी पर्यन्त अहवाल द्यावा लागेल असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
दरम्यान, जो पर्यंत दया याचिकेवर निर्णय घेता येणार नाही तोपर्यंत फाशी देण्यात येणार नाही. याबाबत एक विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होईल. गुरुवारी (आज) सुनावणीवेळी न्याधीशांनी म्हटले की, दिल्ली तुरुंगाच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर नियमांनुसार दोशींना १४ दिवसांचा अवधी मिळतो. राष्ट्रपतींनी दया याचिका फेळाळली तरीही नव्याने डेथ वॉरंट जारी करावे लागणार आहे. त्यामुळे २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. त्यासाठी तुरुंग अधिकार्यांेना नवीन वॉरंटसाठी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे.
नवी दिल्ली - भारतासह दक्षिण-पूर्ण आशियातील प्रमुख विमान कंपनी &l....
अधिक वाचा