ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 07:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले

शहर : देश

देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया साहूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू मांडणाऱ्या विधीज्ञ सीमा कुशवाहा या आता हाथरस बलात्कार पीडितेचा खटला लढणार आहेत. त्यासाठी सीमा कुशवाहा गुरुवारी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी कुशवाहा यांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू दिले नाही.

याबाबत बोलताना सीमा कुशवाहा म्हणाल्या की, मी पीडितेच्या कुटुबियांना भेटल्याशिवाय परतणार नाही. पीडितेच्या कुटुबियांनीच मला त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडण्याची विनंती केली आहे. परंतु येथील प्रशासन मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही. यावेळी कुशवाहा यांनी सांगितले की, त्या पीडितेच्या भावाच्या संपर्कात आहेत.

सीमा कुशवाहा यांनी निर्भया बलात्कार खटल्यात निर्भयाच्या कुटुंबाची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या तरुणीवर 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. निर्भयाला उपचारांसाठी सिंगापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिथे उपचारांदरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

कुशवाहा या निर्भयाच्या बाजूने न्यायालयात उभ्या राहिल्या. त्यांच्या कठोर मेहनतीमुळेच या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या वर्षी 20 मार्च रोजी चारही आरोपींना फाशी देण्यात आली. सीमा कुशवाहा आता हाथरसमधील बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तिची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. परंतु उत्तर प्रदेशमधील प्रशसन त्यांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही.

बलात्कारानंतर गळा आवळून हत्येचा प्रयत्न

यूपीच्या हाथरस (Hathras) जिल्ह्यात राहणारी मुलगी, 14 सप्टेंबर रोजी शेतात काम करत असताना, चार नराधमांनी तिला खेचत बाजूला नेले. नराधमांनी आधी पीडितेवर सामूहिक अत्याचार (GangRape) केला. मग तिच्या पाठीचा मणका मोडला. इतक्यावर ते थांबले नाहीत. बोलता येऊ नये म्हणून पीडितेची जीभही छाटली. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. आई आणि भावाने शोधाशोध केल्यावर ती शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली.

पीडितेच्या गळ्यात तीन फ्रॅक्चर झाले होते. 15 दिवसांपर्यंत ती इशाऱ्यांत आपल्या असह्य वेदना मांडत होती. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. 22 सप्टेंबरला रुग्णालयात जबाब नोंदवताना कसेबसे तिने आपबीती सांगितली. तिने दिलेल्या जबाबावरून चारही नराधमांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

मागे

COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार
COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार

देशात कोरोनाचा कहर अजूनही कायम आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये (RT-PCR Test Kit) दिवसें....

अधिक वाचा

पुढे  

हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने
हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने

हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी....

Read more