ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

यावेळी निर्मला सितारामण यांनी आरोग्य विभागासाठी १५ हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2020 02:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

यावेळी निर्मला सितारामण यांनी आरोग्य विभागासाठी १५ हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्

शहर : देश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी २० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सलग पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेजची माहिती देत आहेत. दरम्यान आज निर्मला सितारामण यांनी आत्मनिर्भर अभियानाच्या पाचव्या पॅकजची घोषणा केली. सुरुवातीलाच त्यांनी जमिन, कामगार, लिक्विडीटी आणि कायदा संदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत.

केंद्रातर्फे गरीबांना आर्थिक सहाय्य केले जात आहे. राज्य सरकारमार्फत देखील ही व्यवस्था होत आहे. ३ महिन्यांचे धान्य देण्यात आले आहे. जनधन योजनेमार्फे २० कोटी जणांच्या अकाऊंटमध्ये पैसे देण्यात आले असून ही रक्कम १०००२५ कोटी इतकी आहे. ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या खात्यात १० हजार कोटी देण्यात आले आहेत. बांधकाम मजुरांना ५०.३५ कोटी देण्यात आले.

यावेळी निर्मला सितारामण यांनी आरोग्य विभागासाठी १५ हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांचा विमा, टेस्टींग, लॅब साठी ५५० कोटी, कोरोनासाठी राज्यांना ४११३ कोटी रूपये जाहीर केले आहेत.

 ग्रामीण भागात शिक्षणासाठी ऑनलाईनवर भर देण्यात येणर आहे. ऑनलाईन क्लाससाठी नवे १२ चॅनल, ई स्कूलमध्ये २०० नवीन पुस्तकांचा समावेश करण्यात येणार आहे.

 

मागे

लॉकडाऊन : जेवणाच्या पाकिटावरून वाद एकाची हत्या, दुसरा गंभीर जखमी
लॉकडाऊन : जेवणाच्या पाकिटावरून वाद एकाची हत्या, दुसरा गंभीर जखमी

लॉकडाऊनच्या काळात विविध संस्थांच्या माध्यमातून वाटल्या जाणाऱ्या जेवणाच्....

अधिक वाचा

पुढे  

कोणत्याही क्षणी होईल लॉकडाऊन ४ ची घोषणा, असे होतील बदल
कोणत्याही क्षणी होईल लॉकडाऊन ४ ची घोषणा, असे होतील बदल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा त....

Read more