By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2020 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
ग्रामीण भागात तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने 'स्वदेश बाजार' हे ऑनलाइन पोर्टल सुरु करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'स्वदेश बाजार' ऑनलाईन पोर्टल 'The Swadesh Bazzar Online Portal' लॉन्च करण्यात आलं.
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितलं की, 'आपल्या देशात चांगलं काम करणार्यांची संख्या कमी नाही. त्यांची उत्पादनं आणि गुणवत्ताही चांगली आहे, परंतु त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. ज्यावेळी एखादं उत्पादन ग्राहकापर्यंत पोहचतं, त्यावेळी या मार्गात येणाऱ्या अनेक माध्यमांच्या नफ्यामुळे उत्पादनाची किंमत इतकी वाढते की, सामान्य ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेर जाते. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने हे कमी केलं जाऊ शकतं, त्याशिवाय तंत्रज्ञानाची किंमतही खूप कमी आहे.'
नितीन गडकरी म्हणाले की, भारताच्या एमएसएमईकडून निर्यात करणार्या ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनची वार्षिक उलाढाल 7000 कोटी रुपये आहे. अमेझॉन करत असलेले काम आपणही करू शकतो. स्वदेश बाजार ऑनलाइन पोर्टल याच दिशेने कार्य करेल. आपल्या प्लॅटफॉर्मवर क्वालिटी प्रोडक्टद्वारे व्यापार वाढवता येऊ शकतो. आज देशातील अनेक महिला बचतगट अतिशय चांगल्या वस्तू तयार करत आहेत. अशा लोकांना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. आपल्या देशात नाविन्यपूर्ण उत्पादनांची कमतरता नाही.
हमारे देश के विकास में हमारे MSME सेक्टर का बहुत बड़ा योगदान है, अभी GDP ग्रोथ रेट में से 30% आय MSME से आती है, हमारे 48% निर्यात MSME का है और अभी तक हमने 11 करोड़ नौकरियां पैदा की हैं: स्वावलंबन ई-समिट 2020 में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी pic.twitter.com/AmhUzt4y2j
— ANI_HindiNews (@AHindinews) August 16, 2020
आत्मनिर्भर भारतअंतर्गत, आपल्याकडे कमीतकमी आयात आणि निर्यात जास्त असावी असं धोरण असावं. देशातील गरिबी दूर करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. यासाठी ग्रामीण भागातील वस्तूंमधून चांगल्या प्रतीची उत्पादने तयार केली जातील आणि त्यानंतर या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल.
विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्य....
अधिक वाचा