ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक', नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 10:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'ना फेरफटका, ना मॉर्निंग वॉक', नागपूर लॉकडाऊननंतर तुकाराम मुंढेंचे कडक नियम

शहर : नागपूर

कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे यानुसार नागपूर शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा आणि उद्योग बंद करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे आता नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांच्या या शिस्तीचा नागरिकांना अनुभव येणार आहे. एपिडमिक अॅक्टच्या नियम 10 नुसार मुंढे यांनी हा निर्णय घेतला आहे. यानुसार नागरिकांना केवळ आवश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, अशा सक्त सुचना देण्यात आल्या.

पिण्याचे पाणी, सिव्हेज सर्व्हिस, फोन, दूध, भाजी, किराणा अशा काही मोजक्या गोष्टींना या लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट देण्यात आली आहे. रेस्टॉरन्ट आणि हॉटेल्सवरही निर्बंध लादण्यात आले असले, तरी या ठिकाणी होम डिलिव्हरी करण्यास मुभा देण्यात आली आहे. कॉमर्स डिलिव्हरी, मीडिया, आय टीमधील अत्यावश्यक सेवा यांनाही काही प्रमाणात सूट असणार आहे.

लॉकडाऊनची घोषणा करताना तुकाराम मुंढे यांनी नागरिकांनी पॅनिक होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी मॉर्निंग वॉकलाही घराबाहेर पडू नये, अशा सुचना दिल्या आहेत. अत्यावश्यक ठिकाणी बस सेवाही सुरु ठेवण्यात येणार आहेत. हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील. त्यानंतर आवश्यकतेनुसार याची मुदत वाढवण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

मागे

अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का
अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का

अभिनेता अमेय वाघ  एका नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. मात्र, को....

अधिक वाचा

पुढे  

प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी
प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचं आवाहन, पुण्यात मात्र उलट चित्र, पुणे स्टेशनवर तुफान गर्दी

कोरोनाशी लढा देण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात असता....

Read more