By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, भारतीय जनसंघाचे दीनदयाल उपाध्याय व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी सरकार कोणताही आयोग स्थापन करणार नाही . तसेच त्याबाबत कोणताही प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे . माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंदमध्ये मृत्यू झाला होता. 23 जून 1953 रोजी श्रीनगरच्या कस्टडीत श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू झाला होता तर उत्तर प्रदेशातील तत्कालीन मुघल सराय रेल्वे स्टेशन जवळ दीनदयाळ उपाध्यायांच्या मिळाला होता. या नेत्याच्या मृत्यूच्या चौकशीची विविध स्तरातून विनंत्या आल्या आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याबाबत खासदार यांनी संसदेत प्रश्न विचारला होता त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी वरील प्रमाणे स्पष्टीकरण केले.
मंगळवारपासून मुसळधार कोसळलेल्या पावसाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही संततधार ....
अधिक वाचा