By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 04:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पाडली आहे. मात्र, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. प्रजासत्ताक दिनी होणार्याय संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र तो नाकारला गेला आहे.
दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिमाखदार सोहळा पार पडतो. या सोहळय़ामध्ये भारताची संरक्षण दले शस्त्रास्त्रांसह शक्तिप्रदर्शन करतात. तसेच विविध राज्यांचे चित्ररथ संचलनामध्ये सहभाग घेत आपापल्या राज्याच्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांचे प्रदर्शन घडवत असतात. मात्र यावर्षी चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला गेल्याने प्रजासत्ताक दिनातील संचनात महाराष्ट्र दिसणार नाही. महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालचा चित्ररथाचा प्रस्तावही नाकारला गेला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱया संचलनात एकूण २२ चित्ररथ सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या मुद्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणार्याप राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.
त्या म्हणाल्या, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध देखील त्यांनी केला आहे.
पॅन कार्डचा फॉर्म 49A काय आहे? पॅन कार्डसाठी जे कोणी अर्ज करत असत....
अधिक वाचा