ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापुरात २ लाख घरात वीज नाही मोबाईल नेटवर्क गायब

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापुरात २ लाख घरात वीज नाही मोबाईल नेटवर्क गायब

शहर : कोल्हापूर

कोल्हापुरात महापुरामुळे पुरती दैना झाली आहे. २ लाख घरात वीज नाही मोबाईल नेटवर्क गायब आहेत एकूण २३९ गावांमधून २३ हजार ८८९ कुटुंबातील १ लाख ११ हजार ३६५ जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अडकलेल्या २४ जणांना बाहेर काढण्यात आले. तसेच आंबेवाडी तीन ९९ टक्के तर प्रयाग चिखली मधील ८५% कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

त्याचबरोबर स्मशानभूमी ही पाण्याखाली गेल्याने मृतांच्या अंत्यसंस्काराला जागा नाही. शेकडो जनावरे पाण्यातून वाहून गेली आहेत. तर कित्येक जनावरे उपाशी आहेत. पाणी ओसरल्यानंतर पडझड झालेल्या घरांची व जनावरांचे पंचकामे करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. वीज जोडणी करणे, पाणीपुरवठा करणे, जनावरांना चारा पुरवठा करणे याचाही समावेश आहे. पाणी कमी न झाल्यास हवाई मार्गाने इंधन आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागे

अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर-सांगली जलमय
अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर-सांगली जलमय

कोल्हापूर आणि सांगलीत अतिवृष्टीमुळे महापूर येऊन दयनिय अवस्था झाल्याचे चि....

अधिक वाचा

पुढे  

मदत हवी तर 2 दिवस पाण्यात रहा – राज्य सरकार
मदत हवी तर 2 दिवस पाण्यात रहा – राज्य सरकार

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान मांडल्याने कोल्हापूर, सांगली, साता....

Read more