ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चीनमध्ये कोरोना वादळ शमलं, रुग्णांच्या संख्येत घट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 04:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चीनमध्ये कोरोना वादळ शमलं, रुग्णांच्या संख्येत घट

शहर : विदेश

चीनमध्ये उदयास आलेलं कोरोना व्हायरसचं धोकादायक वादळ आता वुहानमध्ये शमलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशत पसरवलेल्या या विषाणूने चीन मध्ये हजारे लोकांचा बळी घेतला आहे. पण आताच्या घडीला वुहानमध्ये एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे ही बातमी संपूर्ण  जगासाठी दिलासादायक ठरणारी आहे.  वुहानने COVID-19 विरूद्धच्या युद्धात विजय मिळवल्याचा दावा  जागतिक संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अदनोम गेब्रेयसस यांनी केला आहे. त्यामुळे वुहान शहराप्रमाणे बाकी देश कधी कोरोना व्हायरच्या विळख्यातून सुटतील हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार.

सांगायचं झालं तर चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदय झाला असला तरी इटलीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. न्यूज एजेंन्सी एएफपीच्या वृत्तानुसार शुक्रवारी २४ तासांमध्ये इटलीत ६२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत इटलीत ४ हजार ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

शिवाय भारतात देखील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नुकताच नवी मुंबईत कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे. तर सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७५ वर गेली आहे.  देशात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आणखी ११ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी ७ मुंबईत तर ४ रुग्ण पुण्यातले आहेत. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता  योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री नागरिकांना करत आहेत.

मुंबईतील खासगी रुग्णालयात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि  हृदयरोग असे आजार होते. एच.आर हिराणी रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झालाय.

मागे

कोरोना गुणाकार करतोय, आपण वजाबाकी करु : उद्धव ठाकरे
कोरोना गुणाकार करतोय, आपण वजाबाकी करु : उद्धव ठाकरे

कोरोना विषाणू गुणाकार करतो. हा गुणाकार टाळायचा असेल तर परदेशातून आलेल्या न....

अधिक वाचा

पुढे  

'जनता कर्फ्यू'मध्ये टाळ्या, थाळ्या आणि घंटानादात जनतेने मानले आभार
'जनता कर्फ्यू'मध्ये टाळ्या, थाळ्या आणि घंटानादात जनतेने मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला ....

Read more