By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 01, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रहदारीच्या ठिकाणी अनेकवेळा एखादी टवाळखोर मुलांची दुचाकी येते आणि हुलडबाजी करून किंवा वाहतुकीचे नियम मोडून निघून जाते पण आपण त्या मुलांना हटकू शकत नाही कारण त्याच्या दुकाचीवर पोलिस आस लिहल असत किंवा पोलिसांच बोधचिन्ह असत. पोलीसाची गाडी असेल म्हणून आपणही त्याच्या नादी लागत नाही. पण आता अश्या ‘पोलिसां’वर यापुढे कारवाई केली जाणार आहे. ठाण्याचे अभ्यासक सत्यजित शहा यांनी या बाबतीत पाठपुरावा केला होता.
कोणत्याही खाजगी वाहनावर ‘पोलिस’ असे शब्द किंवा ‘पोलिसांची बोधचिन्ह’ वापरता येत नाहीत. अगदी वाहन वापर करता गणवेशधारी पोलिस असला तरीही महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम कलम 134(6) आणि मोटर वाहन कायदा कलाम 177 प्रमाणे बोधचिन्ह आणि फलकबाबत कारवाई करता येते. मात्र आपल्याकडे अश्या बाबतीत कारवाईच करत नसल्यामुळे कोणत्याही वाहनावर असे प्रकार दिसून येतात व त्याचा गैरवापर केला जातो. ह्या गोष्टीबदल सत्यजित शहा यांनी याचिका केली होती. त्यावर हायकोर्टाने निर्णय घेताना असे प्रकार ह्यापुढे करता येणार नाहीत व त्यावर कारवाई केली जाईल हे स्पष्ट केले.
अश्या प्रकारे वाहनावर पोलिस किंवा बोधचिन्ह लावून अतिरेकी कारवाया होऊ शकतात,तसेच अनेक प्रकारे नियमही मोडले जातात ह्या बाबीकडेही कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले.
तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे यावर्षीही प्रचंड हाल झाले, य....
अधिक वाचा