By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 11:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. असं असताना आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.
केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करून महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न त्यांना विचारला असता, मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत राज्यसरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही असे रेल्वे मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई लोकल 15 तारखेपर्यंत सुरू करू असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे ऐवजी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या नव्या कृषी कायद्यामुळे त्यांना कसा लाभ होईल याबद्दल जास्तीत जास्त बोलणे पसंत केले. "नव्या कृषी कायद्यामुळे वर्षानुवर्षे जोखडात अडकलेल्या भारतातील शेतकऱ्यांना आम्ही मुक्त केले आहे, या कायद्यामुळे येणाऱ्या वर्षात त्यांची प्रचंड प्रगती होईल, आता शेतकरी आपला माल भारतातल्या कोणत्याही बाजारपेठेत जाऊन विकू शकतात. मात्र विरोधक आपला राजकीय फायदा साधण्यासाठी या कायद्याच्या विरोधात गैरसमज निर्माण करत आहेत", असे पियुष गोयल म्हणाले.
याचप्रमाणे, "सर्वात पहिली किसान स्पेशल ट्रेन आम्ही सुरू केली, ती देखील महाराष्ट्रतील देवळाली इथून, सुरुवातीला तिला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही. मात्र त्यानंतर सर्व ट्रेन भरभरून जात आहेत. शेतकऱ्यांचा माल हा थेट रेल्वे घेऊन जाईल, आता नितीन गडकरी यांनी मागणी केलीये. नागपूरला आता संत्र्याचा सीजन सुरू होईल, त्यामुळे तिथून किसान रेल चालवा, आम्ही त्याची प्लॅनिंग आता करतो आहोत", असे गोयल म्हणाले.
कांदा निर्यात बंदिवरून अनेक आंदोलने झाली होती, त्यावर देखील गोयल यांनी सरकारी बाजू मांडत, " हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी ऑक्टोबर मध्ये पावसाची दाट शक्यता आहे, जर त्यामुळे कांद्याची शेती खराब झाली तर कांद्याचे भाव कुठे पोचतील माहीत नाही, म्हणून आम्ही आधीच निर्यात बंद केली, पण त्यामुळे कांद्याच्या भावावर काही परिमाण झालेलं नाही", असे ते म्हणाले.
गिरणी कामगार नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी काल रात्री ....
अधिक वाचा