By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
लाहोरपासून 400 किमी अंतरावरील सादीकबादचे 330 किलो वजन असलेले रहिवासी नोरुळ हसन (55) यांचे शस्त्रक्रियेनंतर (लप्रोस्केपी सर्जरी ) निधन झाले. पाकिस्तानातील सर्वात जाड व्यक्ति म्हणून ते प्रसिद्ध होते.
नोरुळ हसन यांचे वजन कमी करण्यासाठी लप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शालमार रुग्णालयात डॉक्टर मौज यांच्या पथकाने 28 जुन रोजी केली. त्यासाठी सादिकाबाद येथून त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पाकिस्तानी आर्मी हेलिकॉप्टरने मदत केली. त्याच्यावर 90 मिनिटे ही शस्त्रक्रिया चालली . मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. परंतु त्याच काळात तेथे एक महिला रुग्ण दगावतच तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली. या गोंधळात हसन यांना एक तास उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती तेथील डॉक्टर मजुला हसन यांनी दिली.
वाहतूक कोंडीने ट्रस्ट झालेल्या मुंबईतील प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर आहे.म....
अधिक वाचा