ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आता 'या' ही मार्गावर धावणार शिवशाही, प्रवाशांना दिलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2020 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आता 'या' ही मार्गावर धावणार शिवशाही, प्रवाशांना दिलासा

शहर : मुंबई

एसटी वाहतूक सेवा सुरू केल्यानंतर आता शिवशाहीदेखील रस्त्यावर धावणार आहेत. त्यानुसार ठाणे, बोरिवली, कल्याण येथून बोरिवली, मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर आणि अलिबाग या मार्गांवर वातानुकूलित शिवशाहीची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे- आगारातून २२, ठाणे- आगारातून १६, तर कल्याण आगारातून १२ बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागला होता. त्याचा परिणाम खासगी शासकीय क्षेत्रातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बसला. आता टाळेबंदीत शिथिलता आणून आर्थिकचक्र गतिमान करण्यासाठी विविध व्यवसायांना वाहतुकीला शासनाने परवानगी दिली. यात आता वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून उपरोक्त मार्गांवर शिवशाही धावणार आहे.

मागे

दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का?
दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का?

देशभरात आजपासून नवरात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोलकात....

अधिक वाचा

पुढे  

खास ग्रामीण बांधवांसाठी 'स्वामित्व योजना' अर्ज कसे करावे जाणून घ्या
खास ग्रामीण बांधवांसाठी 'स्वामित्व योजना' अर्ज कसे करावे जाणून घ्या

भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते अलीकडेच स्वामित्व योजने अंतर्गत संपत्ती ....

Read more