ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेशन दुकानांवर स्वस्त दरात मिळणार चिकन आणि मटणही

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रेशन दुकानांवर स्वस्त दरात मिळणार  चिकन आणि  मटणही

शहर : देश

            नवी दिल्ली - सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. परंतु आता रेशन दुकानातून गरिबांना अन्नधान्यांबरोबरच स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे. अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून आता पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देणार असून गरिबांना पोषण आहार कमी किंमतीत मिळावा हा यामागचा उद्देश आहे.

                पोषण सुरक्षेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नीती आयोगाकडून ही योजना तयार केली जात आहे. या प्रस्तावाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नीती आयोगाचे रेशन दुकानांवरील वस्तूंची यादी आणखी व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची सुरुवात किमान एक किंवा दोन प्रोटीनयुक्त खाद्यवस्तूंनी होईल. अन्नधान्यांबाबत बहुतांश भारतीय स्वयंपूर्ण आहेत, मात्र तरीही देशात कुपोषण आणि अॅनिमियासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.


             या समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाकडून विचार सुरु आहे. पुढील १५ वर्षांसाठी नीती आयोगाकडून एक व्हिजन डाक्युमेंट बनवलं जाणार आहे, ज्यात पौष्टीक खाद्यपदार्थ आणि पोषण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. हे व्हिजन डाक्युमेंट १ एप्रिल २०२० पासून लागू केले जाईल. यामुळे अन्नसुरक्षा विधेयक आणखी मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. २०१९-२० या वर्षात अन्नसुरक्षेवर १.८४ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे.
 

मागे

शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार
शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार

       कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्....

अधिक वाचा

पुढे  

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा

            नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपै....

Read more