ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 27, 2020 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ड्रायविंग लायसन्सपासून ई चलानपर्यंत बदलतायत नियम, जाणून घ्या

शहर : मुंबई

गाडी चालवताना खोटे कागदपत्र दाखवून ट्रॅफीक पोलिसांकडून सुटका करता येऊ शकते असा अनेकांचा गैरसमज आहे. बऱ्याचदा पोलिसांकडून कागदपत्रांची सत्यता पडताळणी होत नाही हे सत्य आहे. पण यापुढे असं होणार नाही. आता वाहतूक पोलिसांकडे तुमची कागदपत्रे आधीच असतील.

फसवू नाही शकत

केंद्र सरकारने मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन केले आहे. ऑक्टोबर २०२० पासून वाहतूक संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहे. ड्रायव्हींग लायसन्स आणि चलान सहित वाहनांशी संबधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अधिकृत आढळलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार नाही.

लायसन्सची अधिकृत माहिती

ट्रॅफीक पोलिसांकडे तुमच्या ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहीती आधीच असणार आहे. तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या लायसन्सची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहीती वेळोवेळी अपडेट केली जाणार आहे.

मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये मोटर वाहन नियमांमध्ये महत्वाचे बदल आहेत. यानुसार ऑक्टोबर पासून पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि चलानची माहितीची वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होईल.

 

मागे

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या 82 व्य....

अधिक वाचा

पुढे  

मास्क न घालणाऱ्यांना मुंबई पालिकेचा दणका; आतापर्यंत 52 लाख 81 हजारांचा दंड वसूल
मास्क न घालणाऱ्यांना मुंबई पालिकेचा दणका; आतापर्यंत 52 लाख 81 हजारांचा दंड वसूल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेची स....

Read more