By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 05:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकतीच आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन म्हणजेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी करण्यात आली. यात 19 लाख लोक घुसखोर असल्याचे आढळले आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही एनआरसी नोंदणी लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या नोंदणीत जे अपात्र ठरतील. त्या घुसखोरांसाठी नवी मुंबईतील नेरूळ येथे महाराष्ट्रातील पहिले डेस्टीनेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. त्यांची संख्या कमी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी मुंबईत राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू करण्याची मागणी केली होती. त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने सिडकोला पत्र पाठवून डेस्टीनेशन सेंटरसाठी 3 एकर जागेची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी डोंगरी येथे इमारत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. आज सकाळी ....
अधिक वाचा