ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील, एनटीएने केलं स्पष्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 09:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील, एनटीएने केलं स्पष्ट

शहर : देश

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही माहिती देण्यात आली आहे. एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे ते सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एनटीएने परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असं स्पष्ट केलं आहे.

जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

पुढे  

आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही, फेसबुकने दिलं स्पष्टीकरण
आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही, फेसबुकने दिलं स्पष्टीकरण

फेसबुक हे पारदर्शी, खुलं आणि निःपक्षपाती आहे, फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे ज....

Read more