ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा समाजाला 'ओबीसी'त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा समाजाला 'ओबीसी'त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा

शहर : पुणे

मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी दिला. जर लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू, अशी भूमिका ओबीसी संघर्ष सेनेनं मांडली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मण हाके, बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, ओबीसी संघर्ष सेनेचे रामदास सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य गुरव संघटना प्रताप गुरव, माळी महासंघ अनंता कुदळे, ओबीसी संघर्ष सेनेचे नेते सुरेश गायकवाड उपस्थित होते.ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52 टक्के ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी बांधव आंदोलन करतील,” असा इशारा देण्यात आला.

मराठा समाजाच्या अनेक संघटनांतर्फे समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करुन ओबीसींच्या आरक्षणात 5 टक्के आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांची ही मागणी घटनाबाह्य आहे. तसेच ओबीसींवर अन्याय करणारी आहे. त्याबद्दलचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाकडे पाठवत आहोत,” असे प्रा. हाके यांनी सांगितले.

मागे

कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर
कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर

लातूर शहरातील एका तरुणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात बेड म....

अधिक वाचा

पुढे  

केंद्र सरकारला कुठलेही प्रश्न विचारा, उत्तर एकच.. 'माहिती उपलब्ध नाही'
केंद्र सरकारला कुठलेही प्रश्न विचारा, उत्तर एकच.. 'माहिती उपलब्ध नाही'

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप अखेर वाजलं. कोरोना काळातलं अधिवेशन असल्य....

Read more