ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान, राजकारण तापले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 06:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान, राजकारण तापले

शहर : पुणे

पुण्याच्या (Pune) एल्गार परिषदेत ( Elgar conference) हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान (objectionable statement on Hindu Dharma in Elgar conference) करणाऱ्या शरजीलवरून राज्यात मोठे राजकारण तापले आहे. शरजीलवर कडक कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर असे शब्द एखाद्या हिंदूने दुसऱ्या धर्माबाबत वापरले असते तर काय झाले असतं? असा खोचक सवाल अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र शब्द जपून वापरायला हवेत अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. तर वक्तव्य तपासून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

दरम्यान, पुण्यातील एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागविण्यात आला आहे. त्यातील भाषणांची चौकशी करू. त्यात काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली आहेत का, याची तपासणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास पुढील कारवाई होईल, असे  गृहमंत्री अनिल देशमुख स्पष्ट केले आहे.  30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद झाली.  2017 मधील एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती.

30 जानेवारीच्या या परिषदेत लेखक अरुंधती रॉय, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, राजा वेमूला हे प्रमुख वक्ते होते. या सर्वच वक्त्यांनी अनेक मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या सभेत अनेक पुरोगामी नेते सामाजिक कार्यकर्त्यांची सहभागी झाले होते

उस्मानी यांनी एल्गार परिषदेत भाषण करताना 'हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपने याची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.

 

मागे

नवी मुंबईत बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण
नवी मुंबईत बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण

महानगरपालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून ६ ठिकाणी कोंबड्यांना ....

अधिक वाचा

पुढे  

लोकलमधून इतक्या लाख प्रवाशांचा प्रवास, रेल्वेला इतक्या कोटींचं उत्पन्न
लोकलमधून इतक्या लाख प्रवाशांचा प्रवास, रेल्वेला इतक्या कोटींचं उत्पन्न

दहा महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर नियम व अटींसह सर्वसामान्यांसाठी लोकल स....

Read more