By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शनिवारी रात्री 1.30 ते 2,30 च्या दरम्यान चंद्रयान 2 चंद्राच्याभूमीवर उतरेल.त्याच बरोबर भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ही ठरेल. त्यानिमिताने इस्रोच्या अनेक अधिकार्यांनी ह्या मिशनला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चंद्रयान च्या पहिल्या मिशन च्याही आठवणी जगावल्या आहेत.
चंद्रयान -१ अभियानाचे नेतृत्व करणारे इस्रोचे माजी अध्यक्ष जी माधवन नायर म्हणाले की, “ही एक आश्चर्यकारक घटना (सॉफ्ट-लँडिंग) असेल”. आम्ही सर्व त्याची वाट पाहत आहोत. मला खात्री आहे की हे अभियान 100 टक्के यशस्वी होईल.
त्याचवेळी इस्रोचे आणखी एक माजी अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सॉफ्ट लँडिंग अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे, असे म्हटले आहे. कुमार म्हणाले, आतापर्यंत जे घडले त्याच्या तुलनेत आपण आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. आतापर्यंत सर्व काही योजनेनुसार आहे. तर, आशा आहे की ही योजना भविष्यात यशस्वी होईल.
चंद्रयान -२ प्रकल्प संचालक ए. एन्नादुरई यांनी चंद्रयान -२ च्या सॉफ्ट लँडिंगची यशस्वीतेची आशा व्यक्त केली. ते म्हणाले, इस्रोकडे 40 पेक्षा जास्त जीईओ (जिओसिंक्रोनस इक्वेटोरियल ऑर्बिट) मोहिमाचा अनुभव आहे
आज प्रत्येक भारतीयाचे लक्ष चांद्रयानाच्या यशस्वी लॅंडींग कडे लागून आहे. तर अनेक ठिकाणी प्रार्थना केल्याजात आहेत. चंद्रयान -२ च्या लँडिंगबाबत अन्य ज्येष्ठ शास्त्रज्ञांनाही विश्वास आहे.
सध्या सुरू असलेल्या मंदीचा फटका हळू हळू छोट्या उद्योगांना बसू लागला आहे. आश....
अधिक वाचा