ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई विमानतळावर एअर फोर्सचे एएन-32 विमान धावपट्टीवरुन उड्डाण करताना घसरले

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई विमानतळावर एअर फोर्सचे एएन-32 विमान धावपट्टीवरुन उड्डाण करताना घसरले

शहर : मुंबई

मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे उशिराने होत असल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. इंडियन एअर फोर्सचे एएन-32 विमान मंगळवारी रात्री मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरुन उड्डाण करताना घसरले.  आज पहाटेपासून सुमारे 50 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून विमानांचा उड्डाणे वेळेच्या 28 मिनिटे उशिराने होत असल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मुंबईवरुन हे विमान कर्नाटकातील एअर फोर्सच्या येलहंका तळावर निघाले होते.
विमानतळाच्या 27 नंबरच्या धावपट्टीवर हा अपघात घडला. सध्या 32 नंबरच्या धावपट्टीचा उपयोग केला जात आहे. एएन-32 हे मोठे विमान असून मालवाहतुकीसाठी या विमानाचा उपयोग केला जातो. रात्रीच्या वेळी मुंबईवरुन विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांना फटका बसला. विमानतळावर मोठी रांग लागली होती. काही विमाने दुसर्‍या विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आली.

मागे

रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला; आयकर विभागात गोंधळ 
रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला; आयकर विभागात गोंधळ 

बंगळुरूच्या एका रिक्षा ड्रायव्हरने आयकर विभागाला गोंधळात पडलेल आहे. यानं क....

अधिक वाचा

पुढे  

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहूल गांधी यांची भेट 
चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहूल गांधी यांची भेट 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्ली....

Read more