By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
रायगड - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक वेगळं चित्र पहायला मिळालं. रस्त्यावर अक्षरश मासे तरंगत असल्याने लोकांची तमाम गर्दी होती. खालापूर येथील तलावातून मासे भरुन टेम्पो मुंबईकडे रवाना होत असताना जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघात झाला. अपघातानंतर माशांनी भरलेले सर्व ड्रम खाली रस्त्यावर पडला आणि सर्व मासे रस्यावर परसले. हे सर्व मासे मंगरुळ जातीचे होते.
रस्यावर माशांचा खच झाल्याने लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. माशांसोबत ड्रममधील पाणीही रस्त्यावर साचल्याने मासे त्यात तरंगत होते. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली होती.
अमरावती : उशिरा का होईना राज्यात विविध ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्य....
अधिक वाचा