By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 12, 2019 03:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
होर्डिंग कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चर्चगेट स्टेशनजवळ घडली. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर जखमी व्यक्तीला उपचारासाठी जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हे होर्डिंग नेमकं कशामुळे कोसळलं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.चर्चगेट स्टेशनजवळील एक होर्डिंग दुपारी पावणे एकच्या सुमारास कोसळलं. यामध्ये मधुकर अप्पा नार्वेकर (वय 62 वर्षे) जखमी झाले. त्यांना जी. टी. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी नार्वेकर यांना मृत घोषित केलं. कोसळलेलं होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत येत असल्याची माहिती समोर आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वायू चक्रीवादळ गुजरा....
अधिक वाचा