By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 05, 2020 05:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
ठाणे : मध्य रेल्वेच्या कळवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान कळवा फाटक येथे एकूण तीन प्रवासी लोकमधून पडल्याने या पैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लोकलमधून पडलेल्या दोन जणांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले प्रवासी मुंब्रा येथील राहणारे आहेत.
लोकलमध्ये मोठी गर्दी उसळल्याने हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्षींनी अशी माहिती दिली आहे. तसेच हा अपघात आज सकाळच्या दरम्यान ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कल्याणकडून आधीच गर्दीने भरून आलेल्या लोकलमध्ये कळवा स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी चढले. मात्र, या चेंगरा-चेंगरीत प्रवाशी लोकलबाहेर फेकले गेले.
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फा....
अधिक वाचा